Ad will apear here
Next
‘सिंहगड’च्या २१ महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिंहगड व्यवस्थापनामधील २१ महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सिंहगड वडगाव संकुलातील सिंहगड कल्चरल सेंटरमध्ये आयोजित केला होता.  सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २१ महाविद्यालयांमधील सहा हजार ४२८ स्नातकांनी पदवी ग्रहण केली.

यामध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, वाणिज्य, विधी, विज्ञान, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन व हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘सिंहगड’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर व इंडियन ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडियाचे संचालक संजय निबंधे  उपस्थित होते. स्नातकासाठी काळा, प्राचार्य व संचालकांसाठी निळा व प्रमुख पाहुण्यांसाठी मखमली लाल असा विशेष पोशाख होता.

सुरुवातीला सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजमधून निघालेली मिरवणूक सभास्थानी पोहोचल्यानंतर सिंहगड लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. एम. एन. नवले यांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

या वेळी संजय निबंधे यांनी यश हे सोप्या पद्धतीने मिळत नसल्याचे नमूद करून त्यासाठी त्यांना योग्य दिशेने मेहनत करण्याची गरज असल्याचे सांगितले.

डॉ. विद्यासागर यांनी वैज्ञानिक व अभियंता यामधील फरक समजावून सांगितला. ते म्हणाले, ‘‘सिंहगड’मधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशात, तसेच अनेक विद्यार्थी घडवण्यामध्ये ‘सिंहगड’चा मोलाचा वाटा आहे, हे आता सिद्ध झाले आहे. वैदिक काळामध्ये आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता होती. आजच्या युगामध्ये स्त्रियांनी अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कामाचा ठसा उमटला आहे. अंतराळवीर महिला सुनीता विल्यम्स, कल्पना चावला ही याची प्रातिनिधिक यांची उदाहरणे आहेत. या २१व्या शतकातही स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये यशाची उंची गाठू शकतील.’

प्रा. नवले यांनी ‘सिंहगड’चे नाव मोठे करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा भरीव वाटा असल्याचे सांगितले. तसेच भविष्यामध्ये शिक्षण संस्था म्हणून आम्हाला विद्यार्थ्यांची नाते कायमस्वरूपी ठेवायचे असल्याचे नमूद करत कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयांतील शिक्षकांची संवाद साधण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. किशोर गुजर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSQBX
Similar Posts
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली.
काशीबाई नवले कॉलेजमध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहात कुसगाव : येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ फेब्रुवारी २०१९ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक प्रक्रिया व नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन हा चर्चासत्राचा विषय होता.
‘सिंहगड’मध्ये माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कुसगाव येथील एस.के.एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ने दिलेल्या ज्ञान व कौशल्याच्या शिदोरीवरच मार्गक्रमण करत असल्याचे सांगून ‘सिंहगड’विषयी कृतज्ञता व्यक्त केली
‘विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, मानवतेची भावना अंगीकारावी’ पुणे : ‘आयुष्यात अनेकदा अडचणीचे प्रसंग येतील. त्यातून स्वतःला उभे करण्याचे धैर्य हवे. शेवटपर्यंत शिकत राहण्याची आस असावी आणि व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचे असले, तरी त्यात स्वयंशिस्त आणि मानवतेच्या भावनेतून काम केले, तर अधिक यशस्वी होता येते,’ असा सल्ला पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी विद्यार्थ्यांना दिला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language